Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे.. गेवराईतील नगरसेवकांना पडतोय स्वकार्याचा विसर!

कोरोनाचाच्या महामारीत नगरसेवकांनी कुठे तोंडे खुपसली ?

गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई येथील  नगरसेवकांनी कोरोना महामारी मध्ये सर्वसामान्य जनता समोर अनेक प्रश्न व अडचणी असताना आपण लोकप्रतिनिधी आहोत या शब्दाचा विसर  नगरसेवकांना पडला असून  नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या  तोंडावर मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून आणि आपणच कशी कामाचे आहोत हे दाखवून विजयाचा गुलाल अंगावर घेणाऱ्यांना निवडणुकीनंतर मतदारांचा सोयीस्कर विसर पडताना दिसत आहे. साध्या पत्राच्या घरात राहणारा नगरसेवक पाच वर्षाची कारकीर्द उपभोगायला मिळाली की टोलेजंग बंगलात दिसतो. गाड्या, घोड्या दिसतात मात्र ज्या मतदारांच्या मतावर हे ऐश्वर्य उपभोगायला मिळाली त्याच मतदारांचे  आज  शहरांमध्ये  कोरोना सारख्या महामारीत  अनेकांना अनेक प्रश्न भेडसावत असताना  जनतेचे सेवक असणाऱ्या नगरसेवकांनी  सध्या कुठे तोंडी खुपसली असा सवाल  मतदारांकडून उपस्थित होताना दिसत आहे. दिल्या घेतल्या वचनांची शपथ आहे तुला अशी म्हणण्याची वेळ मतदारानवर आली आहे. 

गेवराई शहरामध्ये आमदार लक्ष्मण पवार यांच्या वर विश्वास ठेवून गेवराईतील जनतेने गेवराई विकास आघाडी च्या ताब्यात एक हाती  सत्ता दिली .मात्र येथील नगरसेवकांना त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे. 

 शहरातील लहान-मोठ्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांच्या निवडी होतात सांडपाण्याची, पिण्याचे पाण्याची व्यवस्था सार्वजनिक नाल्या, रस्ते असे छोटीशे परंतु संवेदनशील प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे नगरसेवकाचे असते . वार्डातील काही समस्या किंवा वार्डातील मतदारांवर काही अडचण आल्यास नगरसेवक हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मानला जातो. मात्र सध्या कोरोना च्या महामारी मध्ये अनेक प्रश्न असताना हे नगरसेवक ढुंकूनही मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पहावयास मिळत नाहीत . मात्र  आता निवडणुका लागल्या की गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या आखाड्यात लंगोट लावून उतरणारे उमेदवार नावापुढे नगरसेवक ही उपाधी लागावी यासाठी निवडणुकीच्या काळात वाटेल ते करायला तयार असतात. मात्र निवडणुका संपल्या की आपणा काम बनता भाड मे जाये जनता याचा प्रत्य नगरसेवकाकडून गेवराई शहरातील नागरिकांना येतांना दिसतो .निवडणुकीच्या काळात मतदारांच्या सकाळच्या चहा करण्यासाठी गॅस पेटवण्या  पासून ते रात्रीच्या ताब्या घेईपर्यंत शंभर चकरा मारणारे हे उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर कोणत्या कामात गर्क असतात याचा प्रश्न मतदारांना पडल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने नको ती नाती ,नाही ते संबंध, या गोष्टीचा वापर करून नगरसेवक म्हणून निवडून येईपर्यंत  मिरवताना दिसतात  मात्र निवडून आल्यानंतर  या सर्व  आश्वासन विसर नगरसेवकांना पडला आहे. स्वतःच्या गुत्तेदारी अन  पुढाऱ्यांची मर्जी सांभाळताना दिसत आहेत .ज्या विश्वासाने गेवराईच्या जनतेने आ. लक्ष्मण पवार यांच्याकडे पाहून उमेदवार कोण आहे याकडे फारसे लक्ष न देता सत्तेच्या चाव्या सोपवल्या ती नगरसेवक मिळालेल्या पदाची मस्ती मतदारांना  दाखवत असल्यामुळे त्यांचे कान पिळण्याची खऱ्या अर्थाने वेळ आली असून हे काम भाजपा आमदार लक्ष्मण पवार करतील का असा प्रश्न सुज्ञ मतदारांकडून  उपस्थित केला जातआहे. तर सध्या कोरोना महामारी मध्ये सर्वसामान्य जनता अनेक प्रश्न  आणि  अडचणीत येत असताना हे नगरसेवक त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व दिलेले वचन पाळण्यासाठी पुढे येतील का हा प्रश्नदेखील देखील मतदारांकडून उपस्थित होत आहे

Sunday 4th of April 2021 11:27 PM

Advertisement

Advertisement