Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

माजलगावच्या पाटील गल्लीत स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव

माजलगांव : शहरातील जुने माजलगांव येथील असलेल्या पाटीलगल्लीतील स्मशानभूमीत नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे लाईट पाणी आदी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे यामुळे अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . 

   माजलगांव शहराचा झपाट्याने विस्तार होत असून लाखाच्यापुढे लोक संख्या सरकत आहे शहरप्रामुख्याने दोन भागात विभागाले आहे जुने माजलगांव वनवीन माजलगांव जुन्या माजलगांवाची ओळख असलेल्या पाटील गल्लीच्या बाजूने सिंधफनानदी वळसा घालून गेली आहे या नदीच्या कडेवर हिंदूधर्माच्या लोकांसाठी मयताच्या अंत्यसंस्कारासाठी 

एक स्मशानभूमी नगरपालिका कडून उभारण्यात आली असून जवळपास निम्मे माजलगांव यास्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात तर दुसरी स्मशानभूमीही नवीन माजलगांवकरासाठी मंगलनात मंदिराच्या बाजूला आहे याही ठिकाणी उरलेले लोक अंत्यसंस्कार करण्यासाठी जातात स्मशानभूमीत ज्या सुविधा असायला पाहिजेत त्या सुविधा दिसून येत नाहीत रात्रीच्या वेळी जर या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाला तर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या जुन्या माजलगांव येथील पाटील गल्लीतील स्मशानभूमीत लाईट नसल्याने बत्ती किंवा चार्जेबल लाईट वापरूनव पाणी नसल्याने डोक्यावर पाणी घेऊन अंतसंस्कार केले जातात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडे आहेतही तोडून रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी वारंवार नगरपालिकेला तोंडी सांगूनही आजतागायत वरीलपैकी कुठलीही सुविधा पुरवण्यात आली नसल्याने या भागातील नागरिक वैतागले असून लवकरात लवकरपाणी , लाईट व रस्त्याच्या बाजूचे झाडे तोडून रस्त्याची साफ सफाई रोज करावी अशी मागणी लोकांतुन केली जात आहे .

Sunday 4th of April 2021 11:18 PM

Advertisement

Advertisement