Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जिल्ह्यातील लॉकडाऊन उठले; नवीन निर्बंध लागू

बीड : जिल्ह्यात २६ मार्च पासून सुरु असलेल्या दहा दिवसीय लॉकडाऊनचा कालावधी आज संपत आहे. त्यामुळे आज (दि.०४) जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात जिल्हात पुन्हा लॉकडाऊन न केल्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध मात्र मात्र जिल्ह्यात लागु राहणार आहेत.

 जिल्हाधिकारी यांनी रविवारी नविन आदेश काढत जिल्ह्यात कडक निर्बंध असतील, त्याचे पालन नागरिकांनी करावे अशा सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनची मुदत न वाढवल्यामुळे जिल्हाकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु बीडसह राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे राज्य सरकारने उद्या पासुन राज्यात कडक नियम लागु करण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे राज्याने लागु केलेले नियम जिल्ह्यात लागु राहणार आहेत. यासह इतर कडक नियम जिल्ह्यात लागु केले आहेत. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागु केले नसले तरी जिल्ह्यात कोरोना माञ अजुनही आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढे घबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 नवीन आदेश सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून आदेशाची प्रत डाऊनलोड करा.

Sunday 4th of April 2021 07:49 PM

Advertisement

Advertisement