Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शनिवारी बीड जिल्ह्यात दोन तरुणांची आत्महत्या

बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.०४) दोन विविध घटनात दोन तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले. आत्महत्येच्या या घटना गेवराई आणि केज तालुक्यात उघडकीस आल्या. 

 केज शहरातील वकीलवाडी भागातील १८ वर्षीय तरुणाने शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चैतन्य अनंत कोकीळ (वय १८) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. चैतन्यच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील राज पिंपरी येथील अनंता तुकाराम माने (वय २१) या युवकाने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलीस अंमलदार उबाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उप रुग्णालय गेवराई या ठिकाणी पाठवले आहे. गेवराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस अंमलदार उबाळे करीत आहेत.

Saturday 3rd of April 2021 07:46 PM

Advertisement

Advertisement