Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कड्यात सर्व व्यापारी व नागरिकांनी अँटीजन टेस्ट व लसीकरण करून घ्यावे: आ. सुरेश धस

आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सतर्क राहून शहरात विनामास्क फिरणारांवर कारवाईचा बडगा उचला,दंडात्मक कारवाई करा याच बरोबर सर्वांनी अॕन्टीजन टेस्ट आणि कोरोना लस घेण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे. 

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी येथील बाजार समितीमध्ये प्रशासन व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.

आष्टी तालुक्यातील कडा ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी दररोज 40 ते 50 खेडेगावातील लोकांचा संपर्क आहे शिवाय या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे परंतु कड्यामध्ये नागरिक शिस्त पाळताना दिसून येत नाहीत त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याशिवाय या शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे यासाठी कड्यातील सर्व व्यापारी व नागरिकांनी टेस्ट करणे गरजेचे आहे याशिवाय लसीकरण  करून घेण्याचे आवाहनही धस यांनी  केले.

कडा शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही  पोलिसांनी जाब विचारला पाहिजे याशिवाय दुपारी 1 वाजल्यानंतर सर्व च्या सर्व दुकाने बंद ठेवली पाहिजे तसेच व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी मास्क हा कायमस्वरूपी वापरलाच पाहिजे  असा आग्रह आमदार धस यांनी या बैठकीत घेतला. वरील नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवण्याचे आव्हान ही सुरेश धस यांनी केले.याप्रसंगी तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे ,सपोनि भरत मोरे,कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल आरबे, सरपंच अनिल ढोबळे ,ग्रामसेवक आबासाहेब खिलारे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक उपस्थित होते

Saturday 3rd of April 2021 06:59 PM

Advertisement

Advertisement