Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

१२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने गढीच्या नवोदय विद्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

गेवराई : तालुक्यातील गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने नवोदय निवासी विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नवोदय विद्यालयात १०२ विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून त्यासह २७ कर्मचारी देखील आहेत  विद्यार्थ्यांसह अध्यापक,  कुटुंबीय आणि  कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य, एक आचारी व एक मेस कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळून आले आहेत.

एकाच वेळी १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी  जगताप यांनी नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक कर्मचारी आदींच्य कोरोना तपासणी साठी आर.टी.पी.सी.आर.(rt-pcr) चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गेवराई तहसीलदार सचिन खाडे गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Friday 5th of March 2021 11:53 PM

Advertisement

Advertisement