Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वीजबिल कमी येण्यासाठी बायपास वायर जोडला

महावितरण कंपनीच्या अहमदनगर येथील भरारी पथकाची कारवाई

आष्टी(प्रतिनिधी)-वीज मीटरमध्ये फेरफार करून सुमारे

3 लाख 17  हजार 420  रुपयांची वीजचोरी केल्या प्रकरणी आष्टी तालुक्यातील चिंचपूर शिवारातील हॉटेलचालक गणेश डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         महावितरण कंपनीच्या अहमदनगर येथील भरारी पथकाने पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या या कारवाईनुसार मंगळवारी सायंकाळी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.महावितरणमध्ये अहमद नगर येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रदीप सावंत यांनी याबाबत फिर्याद दिली.सावंत यांच्यासह भरारी पथकातील सहकारी सहायक अभियंता गफार शेख,कनिष्ठ अभियंता आशिष नावकार व तंत्रज्ञ यशवंत वेदपाठक या चार जणांच्या पथकाने  अहमदनगर-बीड रस्त्यावरील हॉटेल गौरी व्हेज-नॉनव्हेज येथे तपासणी केली असता हॉटेलच्या वीजमीटरमध्ये

(क्रमांक 5220459) वीजबिल कमी येण्यासाठी बायपास वायर जोडल्याचे निदर्शनास आले.त्यावरून

24 महिन्यात एकूण 16 हजार 803 युनिटची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.अधिभारासह एकूण तीन लाख सतरा हजार चारशे वीस रुपयांची वीजचोरी करून महावितरण कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेलचालक गणेश डोंगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thursday 4th of March 2021 07:39 PM

Advertisement

Advertisement