1 मार्च पासून सम व विषम संख्येने होणार वाहतूकीची पार्किंग
गेवराई ( प्रतिनिधी )
शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची वर्दळ तसेच बेशिस्त होणारी वाहतुकीची पार्किंग यामुळे होणारी वाहतुकीची गर्दी कमी व्हावी व वाहान धारकांना पार्किंगची शिस्त लागावी यासाठी शनिवार दि.20 रोजी दुपारी एक वाजता गेवराई नगर परिषद सभागृहात व्यापारी वर्ग व प्रशासनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 1 मार्च पासून सम व विषम संख्येने वाहतूक पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवार दि.20 रोजी दुपारी एक वाजता गेवराई नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलिस निरीक्षक पुरषोत्तम चौबे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रतापराव खरात आदींची उपस्थिती होती. यावेळी गेवराई शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले वाहतुकीची संख्या व यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता शहरात बेशिस्त होणाऱ्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरात मुख्य रस्त्यावरील पार्किंग च्या विषयावर असे ठरले कि, दि.1 मार्च 2021 पासून पी-१ ,पी-२ म्हणजेच सम आणि विषम तारखेला रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्याचे ठरले आहे. जो कुणी ग्राहक, दुकानदार, नागरिक नियम मोडील त्याला पार्किंग च्या दंडाची रक्कम भरावी लागेल.तरी वरील विषयी सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
