आष्टी तालुक्यातील खडकत येथील विठोबा देवस्थानची जमीन परस्पर हडपली
गावक-यांनी केली तहसिलदार यांच्याकडे तक्रार
आष्टी(प्रतिनिधी)-तालुक्यातील खडकत येथील गट नंबर 377 व जुना 114 क्षेञ 18 हेक्टर 34 आर हि विठोबा देवस्थानची जमीन असून,परंतु ह्या देवस्थानच्या जमिनीची हरिदास दशरथ सातपुते व फक्कड लिंबाजी कव्हळे यांनी परस्पर ही जमिन नावावर करून घेतली असून,हडप करण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून लोक कसत असून जमिनीचा उपभोग घेत असणा-यांनी आष्टी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.
याबाबत आष्टी तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की,खडकत येथील गट नंबर 377 व जुना 114 क्षेञ 18 हेक्टर 34 आर हि विठोबा देवस्थानची जमीन असून,ह्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून लोक कसत असून जमिनीचा उपभोग घेत आहेत.परंतु हि जमिन हरिदास दशरथ सातपुते व फक्कड लिंबाजी कव्हळे यांनी आम्हाला याची कसलीच कल्पना होऊ न देता परस्पर आपल्या नावावर करून घेतली आहे.तसेच जमिन घेणारे दोघेही खडकत नावचे नाहीत.तसेच सदरील जमिनीवर आम्ही दरवर्षी उत्पन्न घेऊन आमचे संसार चालवित आहोत.तरी याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हि दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनावर सुुनिल सिताराम पवार,अतुल तुकाराम शिंदे,बबन मारूती जाधव,कल्याण भाऊ काळे,आशाबाई प्रल्हाद भंडारे,किसाबाई मच्छिंद्र कसबे,शहानुर खुदबुद्दीन सय्यद,बाबासाहेब रामचंद्र परदेशी यांच्यासह सुमारे तीस ते चाळीस जणांच्या स्वाक्ष-या आहेत.
