बाजारपेठ भाव मिळत नसल्याने तीस गुंठ्ठे कोबी पिंकावर फिरवला रोटर
तालुक्यातील शेरी येथील हतबल शेतकऱ्यांची व्यथा
आष्टी(प्रतिनिधी)-लाॅकडाऊन काळात तीस ते चाळीस रूपये किलोने भाव मिळत असल्याने हेच पाहुन शेरी येथील शेतकरी याने तीस गुठ्ठे शेतात कोबी लावला पण त्याला दोन ते तीन रूपये किलो भाव मिळत असल्याने भाव परवड नसल्याने चक्क कोबी पिकावर रोटर फिरवला असुन हतबल झालेल्या शेतकऱ्याची ही व्यथा.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील शेतकरी व शिरापुर येथील शाळेवर असलेले शिक्षक बाळासाहेब महाडिक यांनी लाॅकडाऊन काळात कोबीला चांगला भाव मिळत असल्याने त्यांनी देखील कोबी शेती करण्याचा निर्णय घेतला.आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीस गुठ्ठे शेतात घरीच रोपे तयार करून त्याची लागवड केली.चांगला भाव मिळेल या आशेपोटो त्यांनी शाळा पाहुन शेतात काबाड कष्ट करत कोबी केला.पण आता बाजारात चक्क दोन तीन रूपये किलो भाव मिळत असून मला त्यासाठी सतरा हजार रूपये खर्च आला आणि उत्पन्न निघाले चार हजार त्यामुळे नको डोक्याला कटकट म्हणुन त्यानी कोबीच्या शेतात रोटर फिरवुन निराशा व्यक्त केली.शेती करताना सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची तयारी असते.पण शेतीत पिकणाऱ्या मालाला भाव पाडुन मिळत असल्याने शेतकरी हतबल होत आहेत.मी भाव नसल्याने कोबी शेतात रोटर फिरवला असल्याचे शेतकरी बाळासाहेब महाडिक यांनी सांगितले.
