सिद्धेश्वर महाविद्यालयामध्ये सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम संपन्न
माजलगांव दि २२( प्रतिनिधी):- जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथ सप्तमीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम दिनांक २०व २२फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित माजलगांव येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमीच्या निमित्ताने विद्यार्थी व तरुणांमध्ये सूर्यनमस्कारा विषयी जनजागृती करून सर्वांगीन असलेल्या या व्यायाम प्रकारातून मानसिक व शारीरिक विकास करण्याच्या हेतूने हा सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला.दिनांक २०फेब्रुवारी रोजी मुलींचा तर दिनांक २२फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांचा हा सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला.सूर्य मंडळाच्या रचनेमध्ये उभे राहत हे सूर्यनमस्कार घालण्यात आले यामध्ये २५० विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भालचंद्र कराड, उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना, प्रा युवराज मुळ्ये, संतोष लिंबकर क्रीडा मार्गदर्शक डॉ उमेश साडेगावकर व सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती
