Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रोटरी स्थापना दिनानिमित्त स्वारातीच्या कोवीड सेंटर ला सव्वा लाखाच्या साहित्याची मदत

अंबाजोगाई-  रोटरी स्थापना दिनाचे औचित्य साधत आज अंबाजोगाई शहर रोटरी क्लब च्या वतीने स्वारातीच्या कोवीड केअर हॉस्पिटल व रुग्णालयाला आत्यावश्यक साहित्य देवून भरीव मदत केली. तसेच कोवीड केअर सेंटर मध्ये रुग्णसेवा बजावणा-या डॉक्टर परिचारीकांचा व कर्मचाऱ्यांचा "कोवीड योध्दा" म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच दोन गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप ही केले. 

२३ फेब्रुवारी हा दिवस जगभर रोटरी क्लब द्वारा रोटरी डे (स्थापना दिवस) म्हणून साजरा केला जातो.

                 या निमित्ताने जगभर विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी द्वारा आज स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील कोवीड केअर सेंटरमध्ये १ लाख २० हजार रुपयांची आवश्यक त्या वस्तु भेट देण्यात आल्या. तसेच रूग्णालयात उपचारासाठी विविध वॉर्डात दाखल करण्यात आलेल्या

पेशंटच्या नातेवाईकांना वार्ड बाहेर परिसरात बसण्यासाठी म्हणून २० सीमेंट बेंच ही देण्यात आले. तसेच शहरातील दोन गरजू महिलांना दोन शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

     रोटरी स्थापना दिनानिमित्त आज स्वारातीच्या कोवीड सेंटर परीसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मेडिसीन विभाग प्रमुख  डॉ. सिध्देश्वर बिराजदार, रुग्णालय अधिक्षक डॉ. राकेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश आब्दागिरे, अधिपरिचारीका उषा भताने उपअधीक्षक डॉ. विश्वजीत पवार,  रोटरी चे सचीव कल्याण काळे,   व इतर सदस्यांच्या उपस्थितीत कोवीड केअर हॉस्पिटलला २० वॉल हँगर, २ कमोड चेअर, ३५ डस्ट बिन, १० प्लास्टीक खुर्च्या, १५ बकेट्स, ६ वॉल क्लॉक, 

१ औषध बॉक्स, १ गोळ्यासाठी बॉक्स, १ इंजेक्शन कॅरियर, ५ ऑक्सी मीटर, २ थर्मल गण असे एकूण असे एकूण १ लाख २० हजार रुपयाचे साहित्य देण्यात आले.

  यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत रोटरी क्लब चे सचिव कल्याण काळे, सदस्य स्वप्नील परदेशी,  गोरख बापू मुंडे गणेश राऊत,  प्रदीप झरकर,  रोहिणी पाठक,   प्रवीण चोकडा, शकील शेख,  राम सारडा, जगदीश जाजू, सचिन बेंबडे या सदस्यांनी केले. याच कार्यक्रमात  कोवीड वार्ड मध्ये आपली सेवा देणा-या सर्व डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारीवृंदांना करोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाण प्रमाण पत्र देऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्रांतपाल  संतोष मोहिते यांनी केले.

यांनी केले सहकार्य...!

स्वारीती कोवीड केअर सेंटर व रुग्णालय परीसरात देण्यात आलेल्या साहित्यासाठी सयाजी गायकवाड, राजा ठाकूर,  मोईन शेख,  कचरू सारडा, नरेंद्र ठाकूर, सुहास मोहिते,  संजय बुरांडे, चौधरी विलास, अकोलकर महेश, पिंटू पटाईत, डॉ निशिकांत पाचेगावकर,  गोपाळ  पारीख यांनी सहकार्य केले.

Tuesday 23rd of February 2021 07:12 PM

Advertisement

Advertisement