Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

संघटन आणि बूथरचना मजबूत असणे काळाची गरज : खा.डॉ.प्रितम मुंडे

बूथसंपर्क अभियाननिमित्त माजलगाव येथे शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

माजलगाव. -बूथसंपर्क अभियाना निमित्त भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक माजलगाव येथे पार पडली.प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.संघटन आणि बूथरचना मजबूत असणे काळाची गरज असल्याचे सांगताना येणाऱ्या निवडणुकी ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत,त्यामुळे बूथयंत्रणा आणि संघटना सक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी आणि शक्तिकेंद्र प्रमुखांना केले.

माजलगावच्या दुग्गड अपार्टमेंट येथे पार पडलेल्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला जेष्ठ नेते डॉ.प्रकाश आनंदगावकर,बबनराव सोळंके,अरुण राऊत,प्रा.देविदास नागरगोजे,शंकर देशमुख,अशोक तिडके,सुरेश दळवे,बबन सरवदे,दीपक मेंढके,मनोज जगताप,गौरी देशमुख यांच्यासह पदाधिकारी व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थिती होते.

याप्रसंगी बूथ रचना आणि संघटनेचा फायदा सांगताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की “कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला,या काळात भाजप कार्यकर्त्यांनी नागरीकांना मोठ्या प्रमाणात मदत केली.अन्नधान्य वाटप,फूड पॅकेट्स,आरोग्य सुविधा अशा अनेक प्रकारच्या मदतकार्यामुळे सर्वसामान्यांना आधार मिळाला,या मदत कार्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा भाजपच्या बूथ प्रमुखापासून सुरू होते.आपण जनतेची कामे करतो म्हणून आपल्याला त्यांचा पाठिंबा मिळतो आहे,त्यामुळे बूथरचना अधिक सक्षम आणि बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tuesday 23rd of February 2021 06:28 PM

Advertisement

Advertisement