Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ऊसाच्या ट्रॅक्टरला मोटार सायकलची धडक

दोन युवक जागीच ठार

माजलगांव,(प्रतिनिधी):-राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला मोटार सायकलची जोराची धडक बसुन झालेल्या गंभीर आपघातात मोटारससायकल वरील दोघे तरुणांचा जागीच मुत्यु झाला तर एक तरुण गंभीर जखमी झालेची  दुर्घटना माजलगांव पासुन जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रं .६१ सी वरील माजलगांव- गढी रोड वरील  हॉटेल शिवालय समोर दि .२१ फेब्रुवारी रविवार रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली . 

      यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नुसार माजलगांव कडुन मोटरसायकलवरुन राष्ट्रीय माहमार्ग क्रं ६१ सी.वरील माजलगांव- गढी या महामार्गावरुन केसापुरी वसहातीकडे जात असलेल्या मोटरसायकल ( क्र.एम.एच .२४ , ए.एच .३२१८ ) या मोटरसायकलची राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल शिवालय समोर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ( कं .एम.एच .४४ डी .४६१५ ) या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने झालेल्या गंभीर आपघातात माजलगांव येथील रविराज रामभाऊ शेंडगे ( वय २० वर्ष ) रा.बँक कॉलनी , माजलगांव , विवेक भागवत  मायकर ( वय १ ९ वर्ष ) रा.माजलगांव या दोन तरुणांचा जागीच मुत्यु झाल तर ओंकार सुहास  काळे हा तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना दि २१ फेब्रुवारी  रविवार रोजी रात्री १०:३०वाजण्याच्या सुमारास घडली आहे ,  तर या आपघातात गंभीर जखमी झालेल्या ओकार काळे या तरुणास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे , तर याप्रकरणी यातील रविराज शेंडगे याचे  वडील रामहरी शेंडगे यांच्या फिर्यदीवरुन माजलगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Monday 22nd of February 2021 07:34 PM

Advertisement

Advertisement