Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

माजलगांवचे तलाठी , मंडळाधिकाऱ्यांच्या घरांची अचानक झाडाझडती व्हावी कसले अधिकारी ?

माजलगांव,(प्रतिनिधी):-माजलगांवात उपविभागीय अधिकाऱ्याला ६५ हजार रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर कसले अधिकारी ? हे तर उच्चशिक्षीत दरोडेखोरच आहेत , अशी जनभावना झालेली आहे . अधिकाऱ्यांनी पैसे खाण्याच्या लालसेतून पदाचं केलेलं अवमुल्यन एक दिवस जनतेच्या प्रचंड रोषास कारणीभूत असेल असे चित्र तयार होत आहे .

      माजलगांवचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना लाच घेताना एसीबीने पकडल्यानंतर वाळू आणि त्याभोवती फिरणारं अर्थकारण समोर आलं आहे . अनेक अधिकारी आपण खूपच प्रामाणिक असल्याचा आव आणतात . प्रत्यक्षात अवैध मार्गाने पैसे मिळू लागल्यास त्यांना मोह आवरता येत नाही . त्यातून ते असे गळाला लागतात . माजलगांवात असणारे सर्वच तलाठी , मंडळ अधिकारी यांच्या घराची अचनाक झाडाझडती घेतली तर एका एका तलाठ्याच्या घरातून किमान १०-१० लाख रुपयांचा रोख रकमा निघतील , एवढी माया हे कमवत आहे . कमावलेली माया त्यांना बँकेतही टाकता येत नाही . त्यामुळे एकतर हे पैसे घरातच ठेवतात किंवा मग अवैध पध्दतीने प्लॉटींगमध्ये सहभागी होतात . तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी अवैध मार्गाने सुरु असणारी वाळू बिनधोकपणे सुरु रहावी यासाठी आलटून पालटून नाईट शिफ्ट वाटून घेतल्या आहेत . वाळूची गाडी पकडल्यानंतर हे तलाठी - मंडळाधिकारी जागेवरच होईल तेवढी रक्कम पदरात पाडून घेतात . मीडिया किंवा बाहेर कुणाला खबर लागली तर ती गाडी तहसीलला आणून लावतात . त्यानंतर त्या गाडीचे उलट - सुलट कागदपत्रं तयार करून मुळ मालकावर गुन्हा नोंद न करता इतर छुटूर - मुटूर नकली व्यक्तीवर गुन्हा नोंद करतात . परंतु अशा प्रकारे रस्त्यावर गाड्या अडवून पैसे लुटणाऱ्यांना दरोडेखोर म्हणतात . माजलगांवच्या अधिकाऱ्यांचं वर्तन दरोडेखोरांपेक्षा कमी नक्कीच नाही . श्रीकांत गायकवाड हे एसीबीच्या गळाला लागण्यात तलाठी - मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यात भ्रष्ट मार्गाने पैसे कमावण्यासाठी सुरु असलेली अंतर्गत स्पर्धा कारणीभूत आहे . त्यामुळे मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कुणावर किती विश्वास ठेवायचा हे ठरवले पाहीजे . अन्यथा अजुनही बड्या अधिकाऱ्यांचे असेच नंबर लागण्याची शक्यता आहे .

अधिकारी चालवतात टोळी

 माजलगांवात काम करणारे अनेक अधिकारी कुठल्यातरी फुकटछाप नेत्याच्या हातचे बाहुले बनून काम करतात . त्यातून ते आपल्या पदाची प्रतिष्ठा घालवतात . कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाला तरी टारगेट करणे यातून ते मोठी टोळी चालवत असतात .

माजलगांवची पोस्टींग मिळवण्यासाठी लावल्या जातात बोल्या 

   माजलगांवात एखादे पद रिक्त असेल तर हे पद मिळवण्यासाठी अक्षरशः बोली लागते . लावलेली बोली वसूल करण्यासाठी हे अधिकारी मग कुणालाच मोजायला तयार नसतात . त्यातून अशा घटना घडतात .

Monday 22nd of February 2021 07:33 PM

Advertisement

Advertisement