३९ नवे रुग्ण, २४ कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ३९ नवे रूग्ण आढळले तर २४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. सुदैवाने सोमवारी मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ४३१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३९२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३९ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १७, बीड १२, शिरूरकासार ३, परळी २, केज ३ तसेच धारुर व गेवराई तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. सोमवारी २४ जण कोरोनामुक्त झाले. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४५५ एवढी झाली आहे. पैकी १७ हजार ५७१ जण कोरोनामुक्त झाले तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
