Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आ.नमिता मुंदडा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

कृषीमंत्र्यांकडे पंचनामे करून नुकसान भरपाई ची केली मागणी

अंबाजोगाई-:केज विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी थेट बांधावर जाऊन करत.त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.अशी मागणी ही आ.नमिता मुंदडा यांनी केली.

                 अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, ज्वारी,आंबे,टरबूज, खरबूज, डाळिंब, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आज आ.नमिता मुदंडा यांनी सारूळ, जोला, पिंपळगाव, विडा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व राज्याचे कृषी मंञी दादासाहेबजी भुसे  यांना फोन करून नुकसानीचे तत्काळ ऑफ लाईन पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी. अशी विनंती केली.

याप्रसंगी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करताना सोबत अक्षय मुंदडा, केज चे तहसीलदार मेंडके  तालुका कृषी अधिकरी भगत,

विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, रमाकांत बापु मुंडे, केज भाजपा चे तालुकाध्यक्ष भगवान केदार, सुनिल आबा गलांडे, मुरलीधर ढाकणे, सुरज पटाईत, सुनिल घोळवे, मच्छिंद्र जोगदंड, शिवाजी  पाटील,  राहुल गदळे,  सुदाम पाटील, काकासाहेब पाळवदे,  धनराज पवार, केशव घोळवे, संभाजी ढाकणे, शंकर ढाकणे,  दत्ता ढाकणे, आशोक गायकवाड, सुरेश घोळवे, रवी नांदे, उध्दव देशमुख, डॉ. ढाकणे  सदाशिव वाघमारे, बाबा शेख, आशोक गायकवाड यांच्यासह संबधित प्रशासकीय अधिकारी.गिरधावर  तलाठी, कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.

Saturday 20th of February 2021 08:48 PM

Advertisement

Advertisement