Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोरोनाचा संसर्ग वाढू लागला

एकाचा मृत्यू; ५८ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त

बीड - बीड जिल्ह्यात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होवू लागला आहे. मागील महिनाभरात ५० पेक्षा अधिक रुग्ण जिल्ह्यात निष्पन्न झाले नाहीत मात्र शनिवारी (दि.२०) जिल्ह्यात अंबाजोगाईतील नागझरी परिसरातील एका ८५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली तर ४३६ संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात तब्बल ५८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता गाफील न राहता प्रशासनाच्या नियमांचे पालन वेळोवेळी करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात शनिवारी १८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान एक महिन्याहून अधिक कालावधीनंतर शनिवारी प्रथमच जिल्ह्यात ५८ रुग्ण निष्पन्न झाले यात सर्वाधिक २५ रुग्ण बीड तालुक्यातील आहेत. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यात १३, आष्टी तालुक्यात ३, धारुर २, केज ४, माजलगाव ३, परळी ४, पाटोदा २ आणि शिरुर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.आता जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा १८ हजार ३६३ इतका झाला असून यापैकी १७ हजार ५४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५७३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

Saturday 20th of February 2021 08:46 PM

Advertisement

Advertisement