Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

चोरां वर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना जनतेच्या रात्रीच्या गस्तीची गरज-पोलीस निरीक्षक फराटे

 माजलगांव -     माजलगाव शहरांमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढतच असल्यामुळे व शहर पोलिस ठाण्याला कर्मचारी कमी असल्याचे सांगत लोकांच्या सहभागाची शिवाय चोरांवर नियंत्रण मिळणे शक्य नाही हे मान्य आहे पण कमी पोलिसां संख्ये मुळे नागरिकांनीच रात्रीचे जागरण(गस्त) केली पाहिजे असे स्पष्ट मत माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.धंनजय फराटे यांनी व्यक्त केले आहे. शहरातीलसन्मित्र कॉलनीतील श्रीदत्त मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती च्या निमित्ताने आयोजित जंयती उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पो.नी.फराटे बोलत होते ते म्हणाले की, माजलगांव शहर हे शांतता प्रिय आहे तरीही जनतेच्या जीवाचे आणि संपत्तीचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे त्यासाठीच पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत परंतु रात्रीच्या चोरट्यांना जेरबंद करायचे असले तर आता जनतेच्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी प्रत्येक वार्डात त्या नागरिकांची रात्रीच्या गस्ती होणे आवश्यक आहे. असा सल्ला फराटे यांनी दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगांव चे जेष्ठ पत्रकार तथा माजी मुख्याध्यापक संतूकराव मुळी हे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरव शाली व पराक्रमी कार्याबद्दल अभ्यासु भाषण केले.  या वेळी गस्त घालणाऱ्याना प्रोत्साहन म्हणून पोलिस स्टेशनच्या वतीने  काट्या बॅटरी शिटीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सन्मित्र काँलनीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार आनंदगावकर यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर यांनी मानले.

Saturday 20th of February 2021 08:45 PM

Advertisement

Advertisement