Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अरूण राउत यांची मागणी

पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी 

अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राउत यांनी निवेदनाव्दारे तहसिलदार यांचेकडे दि. २० फेब्रुवारी रोजी केली 

आहे.  अवकाळी पावसामुळे तालुक्यात ज्वारी, गहू, हरभरा, पपई आदींसह रब्बी हंगामातील काढणीस आलेले पिके 

भुईसपाट झालली आहेत. २०२० चा खरीप पिक विमा अद्याप आलेला नाही, आघाडी शासनाने सरसकट पिक विमा 

देण्याचे आश्वासन दिले आहे त्याचा त्यांना विसर पडला असुन विमा द्यावा, तालुक्यातील विज ट्ान्सफार्मर बंद केले 


आहेत ते तात्काळ चालू करावेत आणि शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ 

शेतक-यांना मदत द्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी माजलगांवच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 

तालुकाध्यक्ष अरूण राउत यांनी दिला आहे. यावेळी बबनराव सोळंके, मनोज जगताप, लतीफ नाईक, निळकंठ भोसले, 

धनंजय फपाळ, विनायक रत्नपारखी, शरद कचरे, अर्जुन पायघन, अविनाश सोळंके,संघटक नामदेव मुळे, संतोष जाधव, 

सरपंच खय्युम पठाण, अजुम भाई, अजय सोळंके, सुहास लंगडे, सुभाष कांबळे, श्रीकांत मेंडके, दत्ता क्षिरसागर, बाळासाहेब शिंदे, सुशांत जाधवर, शेषेराव खाडे, जयराम गायकवाड ,नितिन घायतिडक ,यांचेसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday 20th of February 2021 08:44 PM

Advertisement

Advertisement