Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेतकरी कापूस प्रक्रीया सहकारी संस्थेच्या माध्यमातून कापसाला चांगला भाव मिळेल-ना.धनंजय मुंडे

मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी कापूस प्रक्रीया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनींग व प्रेसींग फॅक्टरीचे उद्घाटन

परळी- आपल्याकडे कापसाचे चांगले उत्पादन होते.त्यामुळे जिनिंग व प्रेसिंग संस्था उत्कृष्टरित्या चालविल्या तर  शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल.त्यामुळे जर चांगला भाव हवा तर शेतक-यांनी चांगल्या प्रतीचा कापुस पिकवावा,सहकारी संस्था चालल्या पाहिजेत त्या बुडाल्या तर शेतक-यांचेच नुकसान होते असे सांगुन पक्ष,विचार,आणि राजकीय भांडण बाजुला ठेवून आपल्या मातीतील माणसाला मोठे करण्यासाठी ताकद दिली पाहिजे,पश्‍चिम वाहिनीचे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार हे प्रयत्नशील आहे.याकामी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी पुढाकार घेतलेला आहे.यासाठी काही कालावधी लागेल असे सांगुन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी शेतकरी कापुस प्रक्रिया सहकारी संस्था ही शेतक-याच्या कापसाला चांगला भाव देईल व त्या माध्यमातून या परिसरातील शेतक-यांचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

शेतकरी कापूस प्रक्रीया सहकारी संस्था,मर्या.परळीच्या अद्ययावत जिनींग व प्रेसींग फॅक्टरीचे शुक्रवार,दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आ.प्रकाशदादा सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य आमदार संजयभाऊ दौंड,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,माजी आ. अ‍ॅड.विजयराव गव्हाणे (परभणी),राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे,परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिकराव कराड,परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंदराव फड,परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे,राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक भरतराव चामले,अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यप्रशासक गोविंदराव देशमुख,माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजीराव शेजूळ,तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन चंद्रकांत शेजूळ,जागृती मल्टीस्टेटचे चेअरमन प्रा.गंगाधरराव शेळके, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे,बीड जिल्हा मजुर संघाचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे सचिव राजेश देशमुख,डॉ.सुरेश चौधरी,बालासाहेब देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अनिल मुंडे, सरपंच डॉ.राजाराम मुंडे,सुर्यभान मुंडे, सय्यद हानिफ सय्यद करीम (बहादुर), ज्ञानोबा माऊली गडदे, राजाभाऊ पौळ,सरपंच मोहनराव सोळंके,माजी सरपंच बालासाहेब मुसळे,राजभाऊ काळे,शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.नागोराव देशमुख,रणजित लोमटे,दादासाहेब मुंडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून तुतारीच्या निनादात महाराजांना अभिवादन केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक करताना अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी शेतकरी कापुस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या स्थापनेपासुन ते आजतागायतच्या वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.श्री.शरदराव पवार,माजी मंत्री श्री.पंडीतराव दौंड,माजी आ.स्व.बाबुरावजी आडसकर,स्व.पंडीतअण्णा मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.सध्या संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी ना.धनंजय मुंडे,आ.प्रकाशदादा सोळंके,आ.संजय दौंड,राजकिशोर मोदी यांची भरीव मदत होत असल्याचे अ‍ॅड.सोळंके म्हणाले. या भागातील कापुस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आपणही संस्था अद्ययावत पद्धतीने नव्याने सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कारण, बीड-उस्मानाबाद आणि लातूर या झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा असा आपला प्रयत्न राहिल.सहकार टिकला पाहिजे यासाठी काम करणार आहोत असे सागुंन अ‍ॅड.सोळंके यांनी माजलगावचे पाणी वाण धरणात आणण्याची मागणी यावेळी केली.तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शेतकरी कापुस प्रक्रिया सहकारी संस्था भविष्यात एक आदर्श संस्था होईल असा विश्‍वास व्यक्त केला.मागील अनेक वर्षांपासुन अ‍ॅड.सोळंके व अ‍ॅड.देशमुख हे कापुस उत्पादक शेतक-यांसाठी तळमळीने काम करत असल्याचे मोदी यांनी नमुद केले.ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.तर माजी आ.विजयराव गव्हाणे यांनी सहकारी संस्था उन्नत झाल्या पाहिजेत असे सांगुन मराठवाडा वॉटरग्रीड योजना सुरू करावी अशी मागणी करून मराठवाड्याच्या मातीला,शेतीला आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे याकडे लक्ष वेधले.तर आ.दौंड यांनी राज्यात सहकार चळवळीतून शेतकर्‍यांचा कसा विकास झाला हे सांगत ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा कायापालट होत आहे.जनता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे.त्यामुळे आता कोणताही दुसरा विचार जनता करणार नाही असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोप करताना आ.प्रकाशदादा सोळंके यांनी अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके व शेतकरी का.प्र.स.संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.सहकाराला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतकर्‍यांच्या जिवनात समृद्धी येते असे सांगुन पुढील काळात या संस्थेने शेतकर्‍यांच्या कापसाला चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी काळे यांनी करून उपस्थितांचे आभार अ‍ॅड.रणजित सोळंके यांनी मानले.या कार्यक्रमास अ‍ॅड.किशोर गिरवलकर,प्रा.वसंतराव चव्हाण,पुरूषोत्तम चोकडा,दत्तात्रय दमकोंडवार,रामकिसन नादरगे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,माजी नगरसेवक गणेश मसने,राणा चव्हाण, बालाजीसेठ मुंदडा, धर्मराज बिरगड, दिनेश घोडके,विजय रापतवार,अजीम जरगर,महेश वेदपाठक,अ‍ॅड.अनिल लोमटे,प्रा.माणिकराव लोमटे,अ‍ॅड.जी.टी.चौघुले यांच्यासह पंचक्रोषीतील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शेतकरी का.प्र.स.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,अध्यक्ष अ‍ॅड.अमोल सोळंके, उपाध्यक्ष नागोराव देशमुख,कोषाध्यक्ष अ‍ॅड.रणजित सोळंके, संचालक डॉ.रावसाहेब जगताप,संचालक ज्ञानोबा देशमुख सचिव बालासाहेब शिंदे,अभियंता सत्यजित सोळंके, अ‍ॅड.रामेश्वर जाधव, अ‍ॅड.मनजीत सुगरे, अ‍ॅड.चौगुले,अ‍ॅड.साळुंके,व्यंकटराव देशमुख,सचिन सोळंके,बाळासाहेब सोळंके,कुंडलिक सोळंके,चंद्रकांत सोळंके,माणिक सोळंके,विनायक सोळंके,शिवाजी सोळंके,शंकर सोळंके,बलभीम सोळंके,पवन बोडके, श्री.आदाटे,रूस्तूम सोळंके,बाबासाहेब सोळंके यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमास बीड,लातूर,उस्मानाबाद,आणि परभणी जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकरी, जिनिंग व प्रेसींग संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


Saturday 20th of February 2021 06:39 PM

Advertisement

Advertisement