Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने जोपासावा-शिवव्याख्याते डाॅ.बालाजी जाधव

मगरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यान

अंबाजोगाई -  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने जोपासावा असे आवाहन शिवव्याख्याते डाॅ.बालाजी जाधव यांनी केले.ते मगरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात बोलत होते.

तालुक्यातील मगरवाडी येथे शुक्रवार,दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याते डाॅ.बालाजी जाधव यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारमंचावर शिवव्याख्याते डाॅ.बालाजी जाधव,बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे,वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.नंदकिशोर सोमवंशी,उपसरपंच परसराम मगर, संभाजी वाळवटे,लहू शिंदे,विजयकुमार गंगणे,मोहन मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी  मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली.जिजाऊ वंदनेनंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना शिवव्याख्याते डाॅ.बालाजी जाधव म्हणाले की,रयतेचे लोकमान्य राजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संबंध भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची प्रेरक गाथा आजच्या युवकांसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांवर घराघरात शिवचरीत्रानुसार संस्कार झाले तर ते शिवकालीन उज्ज्वल दिवस पुन्हा परत आलेले दिसतील. शिवराय ते भिमराय, जगद्गुरू तुकोबाराय याबाबत प्रबोधन केले. तसेच डाॅ.बालाजी जाधव यांनी सध्याच्या कृषि विषयक कायद्यांवर परखड शब्दांत भाष्य केले.याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले यांनी 2007 पासून मगरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगुन बीड जिल्ह्यात मगरवाडी हे पहिले गाव असेल जिथून प्रबोधनाचा वारसा आजही जोपासला जात आहे. छञपती शिवाजी महाराजांची किर्ती ही जगभर पसरलेली आहे. आठरापगड जाती व मुस्लिम बांधवांना सोबत घेवून आदिलशाही व मुघलांना सळो की, पळो करून सोडणारे छञपती शिवाजी महाराज शेकडो लढाया लढले.पण,ते कायम अपराजित राहिले.या वरून त्यांचे शौर्य दिसून येते. शिवचरित्राचा आदर्श आजच्या पिढीने घेतला एक नितीमान, स्वाभिमानी समाज निर्माण होईल असे प्रतिपादन गोविंद पोतंगले यांनी केले.तर याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.नंदकिशोर सोमवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार गंगणे यांनी तर सुञसंचालन श्रीकांत खुणे यांनी करून उपस्थितांचे आभार गोविंद साठे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी मगरवाडी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ जाधव,उपाध्यक्ष उमाजी मगर,प्रमोद शिंदे,प्रशांत शिंदे, ओंकार माने,स्वप्नील माने,पाडुरंग जाधव, राम माने,जोतीराम माने,ऋषिकेश इंगळे, भागवत मगर,बाळा साठे यांचेसह सर्व ग्रामस्थांकडून पुढाकार घेण्यात आला.व्याख्यानास युवक,महिला व नागरिक उपस्थित होते.

Saturday 20th of February 2021 06:38 PM

Advertisement

Advertisement