Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या पती-पत्नीवर तलवार, चाकूने प्राणघातक हल्ला

बीडमधील घटना; १३ जणांवर गुन्हा

बीड : घरासमोर थांबून शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीवर १३ जणांनी तलवार, चाकू आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी पतीला वाचविण्यासाठी धावत आलेल्या पत्नीवरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले. ही घटना बीड शहरातील एकता नगर भागात बुधवारी (दि.१७)  रात्री घडली. 

संतोष रमेश जाधव (वय ३७, रा. एकता नगर, बीड) असे हल्ल्यातील जखमी व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता ते घरी असताना घराबाहेर मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून डोकावले असता भैय्या साळवे, सौरभ साळवे, सचिन साळवे, आकाश कोकाटे, भरत कांबळे, अशोक वाघमारे, अजय राठोड, अनिल वीर आणि अनोळखी पाच जण कोणालातरी फोनवरून शिवीगाळ करत असल्याचे दिसले. घरात महिला असल्याने तिथे थांबून शिवीगाळ करण्यास जाधव यांनी मज्जाव केला. तेंव्हा त्यांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर घराबेह्र आलेल्या संतोष जाधव यांच्यावर त्यांनी तलवार, चाकू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तलवारीचा डोक्यावरील वार अडविताना जाधव यांच्या हातावर वार बसला आणि डावा हात मनगटापासून तुटून फक्त कातडीवर टिकून राहिला. संतोषचा आरडाओरडा ऐकून पत्नी उषाने त्यास वाचविण्यासाठी धाव घेतली असता हल्लेखोरांनी तिच्यावरही चाकूने वार करून जखमी केले. जाधव दांपत्याचा आरडाओरडाऐकून नातेवाईक आणि गल्लीतील इतर लोक धावून येत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. जखमी संतोष जाधव यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांच्या जबाबावरून सर्व १३ हल्लेखोरांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात आले.

Friday 19th of February 2021 10:55 PM

Advertisement

Advertisement