Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आष्टी येथे शिवरायांना 101 फूट उंच शिवस्तंभाची मानवंदना:मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण 

आष्टी(प्रतिनिधी)-शहरात नुकतेच रस्ता रुंदीकरण झाल्याने बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे.या कामांमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे.यापाठोपाठ शहरातील मध्यवर्ती भागातील चौकात उभा राहणारा शिवस्तंभ राज्यातील सर्वाधिक उंचीचा ठरणार असून,आष्टी शहराच्या वैभवात त्यामुळे भर पडणार आहे.

             आष्टी शहरात आज दि.19 फेब्रुवारी सकाळी 10 वा. शिवजयंती दिनी तब्बल एकशे एक फूट उंचीच्या शिवस्तंभावरील भगव्या झेंड्याच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली आहे.

या शिवस्तंभाचे काम आठ दिवसात पुर्ण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साजरी होत असली तरी शिवभक्तांचा उत्साह दांडगा आहे.आष्टी शहरासह तालुक्यात शिवजयंतीला विविध कार्यक्रम होत असतात.यंदा आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकशे एक शिवजयंती दिनी शिवरायांना मानवंदना फूट उंचीचा शिवस्तंभ उभारण्यात आली असून त्याचा लोकार्पण आज शिवजंयतीच्या दिवशी आ.सुरेश धस यांच्याहस्ते व  आमदार बाळासाहेब आजबे,माजी आ.भिमराव धोंडे,पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,रंगनाथ धोंडे,सुनिल रेडेकर,राधेशाम धस,जितेंद्र शिंदे,प्रितम बोगावत,राहूल शिंगवी,

चेतन मेहेर यामान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


Friday 19th of February 2021 06:18 PM

Advertisement

Advertisement