Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आष्टीत इंडियन मेडिकल असोशिएनची शाखा स्थापन

डाॅक्टरांनी संघटतीत होणे,काळाजी गरज-डाॅ.लोंढे 

आष्टी(प्रतिनिधी)-गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात बाल शिशूगहात आग लागली या आगीत दोषींवर कारवाई करण्याचे सोडून शासनाने डाॅक्टरांना दोषी धरून,येथील डाॅक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.परंतु याठिकाणी इंडियन मेडिकल असोशिएन ने आवाज उठविल्याने डाॅक्टरांवरील कारवाई रोखली हे ऐकीचे बळ असल्याचे इंडियन मेडिकल असोशिएनचे महाराष्ट्र अध्यक्ष डाॅ.रामकष्ण लोंढे यांनी केले.

            आष्टी येथे इंडियन मेडिकल असोशिएन शाखेचे उद्याटन गुरूवार दि.18 रोजी सांयकाळी 6 वाजता संपन्न झाले.यावेळी डाॅ.लोंढे बोलत होते.याप्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष डाॅ.रविंद्र कुटे,महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शिवाजीराव काकडे,आष्टी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डाॅ.

प्रतापसिंह चौरे,उपाध्यक्ष डाॅ.रामदास सानप,सचिव सुनिल बोडखे,कोषाध्यक्ष डाॅ.सुजय सोनवणे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना डाॅ.रामकष्ण लोंढे म्हणाले,महाराष्ट्र राज्याचे राज्य मी 1993 साली या इंडियन मेडिकल असोशिएन चा सदस्य झालो.आणि त्यानंतर मी सुरूवातीला 12 सदस्य केले. आज याच कामाचे चीज झाले आणि तब्बल 39 वर्षांनी मराठवाड्याला राज्याचे नेतत्व करण्याची जबाबदारी मिळाली.मी हे मुद्दामुन सांगतो की,एका शाखेचा सदस्य महाराष्ट्र राज्यात काम करू शकतो.याचे कारण आपण केलेल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.आपण सर्व वैद्यकीय क्षेञात काम करत असतांना आपण आपलाच विचार करत नाही.त्यामुळे आपण सर्वांनी एकञ येणे गरजेचे आहे.बीड जिल्ह्यात सातवी शाखा आहे.तर संपूर्ण भारतात साडेतीन लाख सदस्य आहेत.तरी यात सध्या आष्टीच्या संघटनेने सभासद वाढविणे गरजेचे आहे.गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात बाल शिशूगहात आग लागली त्याचा शासनाने आपल्याला ञास देण्याचा सपाटा लावला आणि प्रत्येक हाॅस्पीटलचे फायर आॅडीट चे नियामली टाकली.यात आता आपला काहि दोष आहे का? तसेच या राज्य शासनाने भंडाराच्या त्या प्रकरणात डाॅक्टरांना दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला परंतु आम्ही तिथे गेलो आणि त्यावर आवाज उठविला असता राज्य शासनाने माघार घेतली.अशी संघटनेची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्याचे उपाध्यक्ष रविंद्र कुटे म्हणाले,महाराष्ट्रात ही आजची 218 वी शाखा स्थापन झाली असून,महाराष्ट्रात 45 हजार पेक्षा जास्त सभासद असल्याचेही राज्याचे उपाध्यक्ष डाॅ.रविंद्र कुटे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शिवाजीराव काकडे म्हणाले,भारतात सर्वात जुने ही शाखा असून,

देशात आत्ता पर्यंत 32 राज्यात साडेसतरा हजार शाखा असून ही सर्वात जुने संघटना आहे.या संघटनेचे दोन उद्दीष्ट्ये आहेत.यातील सर्व वैद्यकीय क्षेञात काम 

करणा-यांना ब-याच अडचणी येतात त्यांना आपण संघनेच्या माध्यमातून आधार देत असल्याचेही त्यांनी सांगितले.मी या संघटनेचा सदस्य का? होऊ असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहिला असेल.कारण या संघटनेत काम करणा-या सदस्यांना आपण सर्वांनी एकञ येऊन मदत करून त्यांच्या कुटूंबीयांना आधार देण्याचे काम करत असतोत.आपल्या संघटनेतील सदस्यांचा दुर्देवाने मत्यू झाला तर त्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येक सदस्यांनकडून दोनशे रूपये प्रमाणे याची साधारणपणे नऊ लाख रूपयांची मदत आम्ही आपल्या सदस्यांच्या घरी पोहच करतोत.तसेच आपल्या डाॅक्टर पेशात जर काहिवर हल्ला झाला काहि अन्याय झाला तर त्यांना जिल्हा ते सुप्रिम कोर्टापर्यंत वकील आपल्या मार्फत देण्यात येतो.त्यामुळे ही संघटना म्हणजे डाॅक्टरांनी डाॅक्टरांनसाठी बनविली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचा मान्यवरांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात डाॅ.अशोक गांधी,डाॅ.मधुकर हंबर्डे,

डाॅ.कल्याणरावजी वारे,डाॅ.डि,एस.काकडे,डाॅ.विलास सोनवणे यांचा जीवन गौरव म्हणून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुञसंचालन अमोल जगताप यांनी केले तर आभार डाॅ.सुजय सोनवणे यांनी मानले. 

Friday 19th of February 2021 06:17 PM

Advertisement

Advertisement