Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वादळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्या : आ.नमिता मुंदडा

अंबाजोगाई : अचानक झालेल्या वादळी पाऊस व गारपीट या मुळे शेतकऱ्यांच्या गहू,ज्वारी,हरबरा,टरबूज,आंबा व विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या.अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी एका पत्रा द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारी पहाटे दोन वाजल्या पासुन अंबाजोगाई तालुक्या सह केज, नेकनूर व परिसरात वादळी पाऊस सुरू झाला.सकाळी नऊ वाजे पर्यंत हा पाऊस सुरूच होता.या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या वादळी  पावसाने वीज पुरवठा ठप्प झाला.तर शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते.

वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने ज्वारी, गहू ही पिके आडवी पडली.तर ज्वारी पावसामुळे काळी पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरबरा शेतात काढून ठेवला होता.ते ढिगारे भिजून मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार वाऱ्याने ढिगारे विस्कटून गेले आहेत.आंब्याला आलेला मोहर ही झडून गेला आहे.काढणी पूर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या पावसाने रात्री पासूनच अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.पाऊस व वीज यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले.या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Friday 19th of February 2021 03:41 PM

Advertisement

Advertisement