Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

चालकामार्फत ६५ हजाराची लाच स्विकारणारा माजलगावचा उपविभागीय अधिकारी गायकवाड एसीबीच्या जाळ्यात

वाळूच्या गाड्या चालू देण्यासाठी मागितली होती ९० हजार रूपयांची लाच

माजलगाव : वाळूच्या गाड्या बिनबोभाटपणे चालू देण्यासाठी चालक लक्ष्मण बाबासाहेब काळे याच्या मार्फत ६५ हजारांची लाच स्विकारणारा माजलगावचा उपविभागीय अधिकारी श्रीकांत शाहू गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना शाखेने सापळा रचून पकडले. गुरूवारी (दि.१८) रात्री माजलगाव शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचा अवैधरित्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. या वाळू माफियांना पाठबळ देण्याचे काम काही लाचखोर अधिकारीच करत असतात. माजलगावचा उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड याने वाळूच्या गाड्या बिनदिक्कतपणे चालू देण्यासाठी ९० हजार रूपये लाच मागितली होती. याबाबत सदर वाळू व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डाॅ. राहुल खाडे यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती. डाॅ. खाडे यांच्या आदेशावरून ही तक्रार जालना शाखेकडे देण्यात आली. जालना शाखेने केलेल्या पडताळणी दरम्यान श्रीकांत गायकवाड याने तडजोडीअंती ६५ हजार रूपयांची लाच चालक लक्ष्मण काळे याच्या मार्फत स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर जालना एसीबीने गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास माजलगाव शहरात सापळा रचून चालक काळे याला ६५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी गायकवाड आणि चालक काळे या दोघांवर माजलगाव शहर ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई अधीक्षक डाॅ. राहुल खाडे, अपर अधीक्षक डाॅ. अनिता जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शाखेचे उपअधीक्षक आर.डी. निकाळजे, अंमलदार ज्ञानेश्वर मस्के, गणेश चेके, जावेद शेख यांनी पार पाडली.

Friday 19th of February 2021 07:24 AM

Advertisement

Advertisement