Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आपेगावचा पशुवैधकीय दवाखाना बनला हायटेक

अंबाजोगाई- सुदंर माझे कार्यालय या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील आपेगाव येथील पशुवैधकीय दवाखाना श्रेणी -2 हा आकर्षक बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दवाखान्यास रंगरंगोटी करुन पशुंची घ्यावयाच्या काळीबद्दल सुवीचार लिहीण्यात आले आहेत. यामुळे सर्वांचेच लक्ष दवाखान्याकडे वेधले जात आहे. 

        कार्यालयाचा परीसर स्वच्छ राहून काम करण्याठी प्रसन्न राहावे यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुभांर यांनी कार्यालय सुंदर करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालयप्रमुखांने हे काम लोकसहभागातून करावे असे निर्देश दिले आहेत. आपेगाव येथील पशुवैधकीय अधिकारी डॉ. बी. एस. कोकणे यांनी आपल्या संकल्पनेतून दवाखान्यास रंगरोगटी करुन घेतली आहे. रंगरंगोटी बरोबरच दखाखान्या दर्शनी भिंतीवर पशुंची काळजी घेण्यासंदर्भात सुवीचार लिहीले आहेत. कार्यालय स्थापनेपासून प्रथमच कार्यालय आकर्षक बनल्याने नागरीकांचे लक्ष वेधले जात असून भिंतीवर पशुं बाबत लिहीलेले सुवीचार नागरीक काळजीने वाचत आहेत.

Thursday 18th of February 2021 09:09 PM

Advertisement

Advertisement