Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

३७ नवे रूग्ण, २३ कोरोनामुक्त

बीड : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे ३७ नवे रूग्ण आढळले तसेच २३ कोरोनामुक्त झाले. सुदैवाने गुरूवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात ४४६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४०९ निगेटिव्ह आले तर ३७ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई १७, आष्टी ५, बीड ७, कज ५, माजलगाव १ व परळीतील २ रूग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार २७५ एवढी झाली आहे. पैकी १७ हजार ४९४ कोरोनामुक्त झाले असून ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Thursday 18th of February 2021 08:00 PM

Advertisement

Advertisement