खरीपाचे पिककर्ज अजूनही मिळेना,शेतकरी अडचणीत
माजी आ.भिमराव धोंडे यांचे बॅकेसमोर उपोषण
आष्टी(प्रतिनिधी)-केंद्र व राज्य सरकार हे शेतक-यांना असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना प्रधानमंञी कृृृृृृृषी सन्मान योजना सुरू केली.परंतु बॅकेच्या अधिका-यांच्या अडमुठ्या धोरणामुळे खरीपाचे पिक अर्ज आठ महिने झाले तरी मिळाले नाही,त्यामुळे बॅक अधिका-यांनी
तात्काळ आता कसलीही दिरंगाई न करता कर्ज वाटप करावे,असे प्रतिपादन माजी आ.भिमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील भारतीय स्टेट बॅकेच्या स्टेशन रोडच्या शाखेत आज गुरूवार दि.18 रोजी सकाळी 11
वाजता शेतक-यांच्या विविध मागण्या व पिककर्जा संदर्भात माजी आ.भिमराव धोंडे यांच्या नेतृृृृृृृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी धोंडे बोलत होते.याप्रसंगी सावता ससाणे,एन.टी.गर्जे,छगन तरटे,
बाबासाहेब गर्जे,शंकर देशमुख,बाबुराव कदम यांच्यासह आदि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,या शाखेच्या गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी येत आहेत.त्यांना याबाबत आपण वारंवार सुचना देऊनही कसलाच कारभार सुधारत नसल्याने या ठिकाणी आज अंदोलन करण्याची वेळ आली आहे.या शाखेने खरीपाचे कर्ज जुलै,आॅगस्टमध्येच वाटप करणे गरजेचे असून सुध्दा आठ महिने झाले तरी सुध्दा अजूनही कर्ज वाटप केली नाही.तसेच गोरगरीब निराधाराचे आलेले पगार देखील कर्ज खात्यात जमा करून घेऊन,शेतक-यांच्या कर्ज खात्याला होल्ड लावीत आहेत.जर बॅक अधिका-यांना आपाली कामे व्यवस्थित करता येत नसतील तर बदली करून जावे परंतु शेतक-यांचे नुकसान करू नये असा सल्लाही माजी आ.धोंडे यांनी दिला.यावेळी बॅकेचे शाखाधिकारी अमितकुमार यांनी सांगितिले की,आपण बॅकेच्या नियमातच कामे करत असुन,आता काहि शेतक-यांच्या खात्याला होल्ड लागला तर तो आमचा दोष नसून,ते कॅम्प्युटरवरच त्याची नोंद होती.तसेच काहि खातेदारांचे सीबील खराब असल्याने त्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत.त्यात बॅक अधिकारी व कर्मचा-यांचा काहिच दोष नसल्याचे त्यांनी सांगितले.
