Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बिल मिळेना ; ठेकेदाराने स्वच्छतेचे काम थांबविले

माजलगांव शहरात घाणीचे साम्राज्य

माजलगांव,(प्रतिनिधी):-माजलगांव नगरपालिकेने शहराची  स्वच्छता करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी टेंडर काढून औरंगाबाद येथील एका कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिला होता . परंतू ,  स्वच्छतेचे संबंधित ठेकेदाराला नगरपालिकेने बिल अदा न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराने मंगळवारपासून शहरातील स्वच्छतेचे काम बंद केले . यामुळे शहरात जागोजागी घाण दिसू लागले आहे .

      माजलगांव नगरपालिकेने तीन  महिन्यापूर्वी स्वच्छतेचे टेंडर काढले . संबंधित ठेकेदाराने हे टेंडर ३६ लाख रुपये कमीने घेतले होते . सुरूवातीला संबंधित ठेकेदाराने शहरातील स्वच्छतेचे काम उत्कृष्ट केले . परंतू , त्यानंतर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास वारंवार त्रास देणे चालू केल्याने त्याने सर्वांचे तोंड बंद केल्यानंतर त्यास काम करू दिले जाऊ लागले . त्यामुळे त्याने सुरुवातीपेक्षा आपली यंत्रणा एकदम निम्म्यावर आणली . टेंडर चालू करून तीन महिने उलटले तरी नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला एक रुपयाही न दिल्यामुळे संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेला दोन दिवसापूर्वी एक पत्र लिहून मला बिल न दिल्यास काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला होता . परंतू , याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने संबंधित ठेकेदाराने मंगळवारपासून शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या , रस्ते साफसफाई व नालीची स्वच्छता करणे थांबवले आहे . यामुळे शहरात दोन दिवसापासून जागोजागी घाण दिसत असून घंटागाडी फिरत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याचे ढीग साचले आहेत .

Thursday 18th of February 2021 07:57 PM

Advertisement

Advertisement