Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ऊसतोड मजुर कर्मचाऱ्यांच्या छळाला शेतकरी वैतागला एकरी ४ ते ५ हजारांची मागणी

एकरी १० हजाराचा अनाधिकृत खर्च

माजलगांव,(प्रतिनिधी):-मराठवाड्यात ग्रीन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजलगांव तालुक्यामध्ये यावर्षी कारखानदारांच्या दुर्लक्षामुळे ऊस उत्पादक  शेतकरी यावर्षी आपला ऊस गाळपासाठी देत असताना ऊसतोड मजुरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लुटीमुळे हैराण झाला आहे आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी द्यावा की फुकून टाकावा अशी मानसिकता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आज झालेली आहे . शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपास देण्यासाठी ऊस तोड मजूर वाहक चालक  कर्मचारी या सर्वांना अनाधिकृतपणे दहा हजार रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने  शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तेव्हा कारखानदारांनी या विरोधात योग्य ती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे .

        माजलगांव तालुक्यामध्ये माजलगांव धरण गोदावरी वरील बंधारे कुंडलिका धरण उपळीचे धरण आधी छोटे मोठे धरणे तलाव १०० % भरल्यामुळे तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे . माजलगांव तालुक्यामध्ये जय महेश , छत्रपती , लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तीन कारखाने चालू आहेत त्याच बरोबर बाहेरील सुद्धा पाच ते सात कारखाने या ठिकाण ऊस गाळपास घेऊन जात आहेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे उत्पादनही आलेले आहे . परंतु आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्यासाठी सर्वात कारखान्याचे ऊसतोड मजूर शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये एकर प्रमाणे मागणी करत आहेत त्याचबरोबर वाहनचालक तीनशे ते पाचशे रुपये एंट्री मागत आहेत साहेबांसाठी म्हणून दोन ते तीन हजार रुपये असे अनाधिकृत एकरी दहा हजार रुपये चा खर्च शेतकन्यांना द्यावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे . कारखान्याचे कर्मचारी कारखानदारांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करू लागले आहेत . आज शेतकऱ्यांना गाळप झालेल्या शेतकऱ्यांनाही तब्बल दीड महिन्यापासून गाळप झालेल्या उसाचे पैसे कारखान्याकडून मिळालेले नाहीत म्हणून माजलगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हा वैतागलेला दिसून येत आहे.कारखानदारांनी आपली वेगळी यंत्रणा लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लुट थांबून भ्रष्ट यंत्रणेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत .

"साखर आयुक्ताच्या समोर तीन्ही कारखानदारांनी माजलगांव तालुक्यातील उसाला प्रधान्य देण्याचे व बेकायदा पैसे घेतल्यास ते परत करण्याचे लेखी दिले असून तरीही तालुक्यातील उस उत्पादकाला उसासाठी बेजार केले जात असून ही परिस्थिती जर अशीच राहीली तर आम्ही त्यांना हायकोर्टात खेचणार आहोत .

 -भाई गंगाभिषण थावरे शेतकरी.

Thursday 18th of February 2021 07:56 PM

Advertisement

Advertisement