Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेतकऱ्यांचा छळ केल्यास मनसेशी गाठ - जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील.

मनसेच्या दणक्याने विज पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे दिले आदेश

वडवणी,( प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांचा शेतीचा विज पुरवठा महावितरणला पुर्व सुचना न देता विज कायदा २००३नुसार बंद करता येत नाही जर थकबाकीदार शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित करायचा असेल तर १५ दिवस अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे तरी महावितरणने विजेसाठी शेतकऱ्यांचा छळ केल्यास मनसे सैनिक जशास तसे उत्तर देतील असा इशारा मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी तेलगाव येथील महावितरणच्या कार्यालयावर काढलेल्या हल्ला-बोल आंदोलनावेळी बोलताना दिला.

राज्य सरकार व महावितरणने थकीत विज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतीचा विज पुरवठा गेल्या १५ दिवसापासून बंद केला होता तरी यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम महावितरणने सुरू केले होते तरी या अन्यायाच्या विरोधात मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी तेलगाव येथील महावितरण कार्यालयावर हल्ला-बोल आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी बादाडे बोलताना म्हणाले की राज्य सरकार,उर्जा मंत्री व महावितरणने शेतकऱ्यांना जाणून-बुजुन त्रास देण्याचे काम सुरू केले आहे तरी शेतकरी गेल्या पाच वर्षापासून दुष्काळ, कोरोना, अतिवृष्टी यासह इतर नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी शेतकऱ्यांचा बंद केलेला विज पुरवठा विना अट तात्काळ सुरू करावा व शेतकऱ्यांचा छळ  केल्यास गाठ मनसेशी आहे .तसेच जो पर्यंत शेतकऱ्यांचा बंद केलेला विज पुरवठा सुरू करण्यात येत नाही तो पर्यंत अधिकारी यांना कार्यालया बाहेर येऊ देणार नाही असा रोखठोक इशारा दिला यावेळी मनसेच्या घोषणा बाजीने कार्यालय परिसर दणाणून गेला होता  यावेळी मनसेच्या या आंदोलनाच्या दणक्याने महावितरणचे डी.एल.तुल उपकार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष मनसे आंदोलक व शेतकऱ्यांच्या समोर येऊन लेखी निवेदन स्विकारूण शेतकऱ्यांचा बंद केलेला विज पुरवठा तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी हल्ला-बोल आंदोलनात मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील,रेखाताई आंबुरे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष,मंदाकिनी तिडके म.आ.उपजिल्हाध्यक्ष, गणेश वाघमारे उपजिल्हाध्यक्ष,मारूती दुनगु जिल्हा सचिव, विठ्ठल शिनगारे ता.अ.धारूर, नवनाथ करांडे ता.अ.वडवणी,भारत इके,गंगाताई खवणे ,गणपत खोटे माजी ता.अध्यक्ष, दिक्षा डोंगरे म.आ.ता.अध्यक्ष वडवणी ,हरिश्चंद्र पवार शेतकरी सेना ता.अ.,प्रशांत शिनगारे विद्यार्थी सेना ता.अ.,रमेश जोगडे विद्यार्थी सेना ता.अ.माजलगांव, सखाराम ढगे विद्यार्थी ता.अ.वडवणी, ईश्वर पुजारी ता.उपाध्यक्ष, नवनाथ दराडे ता.उपाध्यक्ष ,सचिन दरेकर वाहतूक सेना अध्यक्ष वडवणी,पांडुरंग जाधव ,यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनसेच्या आंदोलनाची महावितरणने तात्काळ दखल घेऊन विज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यां मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

थकीत विज बिल वसुली करण्यासाठी विज पुरवठा बंद करण्यात आलेला होता तरी मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिलेल्या लेखी निवेदन व केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आता यापुढे विज पुरवठा बंद करताना १५ दिवस अगोदर शेतकऱ्यांना नोटीस देण्यात येईल तसेच आता बंद केलेला शेतीचा विज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल

-डी.ए.तुल .(उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय तेलगाव).

Thursday 18th of February 2021 07:54 PM

Advertisement

Advertisement