Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन सोहळ्यास उपस्थित रहा

विजयसिंह पंडित यांचे आवाहन

गेवराई - राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर यावर्षी इतर कार्यक्रमांचे आयोजन न करता शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शास्त्री चौक, गेवराई येथे छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन सोहळ्याचे नेत्रदिपक आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर कांडेकर, कार्याध्यक्ष दिनेश घोडके यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने दरवषी शिवजन्मोत्सवाचे मोठ्या थाटात आयोजन केले जाते. शिवपुत्र संभाजी, राजा शिवछत्रपती या महानाट्यासह ऐतिहासिक व नेत्रदिपक मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी महाआरोग्य शिबीर, राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसह विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे नेटके आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना शिवप्रेमी नागरीकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला, यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकट काळात राज्यशासनाने आखून दिलेल्या नियमावलीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला. यावर्षीच्या सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर कांडेकर, कार्याध्यक्ष दिनेश घोडके, सहकार्याध्यक्ष, ऋषिकेश मोटे, उपाध्यक्ष युवराज नागरे, आनंद दाभाडे, नविद फारुकी, सचिव सय्यद नौशाद, सहसचिव किरण सुतार, कोषाध्यक्ष अमित वैद्य, सहकोषाध्यक्ष विजय सुतार यांच्यासह समितीच्या पदाधिकार्यांनी नेत्रदिपक अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शास्त्री चौक गेवराई येथे राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यात येणार असून सामाजिक अंतर राखून सर्व कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले.

Thursday 18th of February 2021 07:53 PM

Advertisement

Advertisement