Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोरोना काळात अंबाजोगाई शहर स्वच्छतेसाठी कार्यरत कंत्राटी स्ञी-पुरूष कामगारांचा सन्मान

विनोद पोखरकर यांचा पुढाकार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील शिवसेनेचे युवा नेते विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोना काळात शहर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे कंञाटी स्ञी-पुरूष स्वच्छता कामगार यांचा सन्मान केला तसेच सर्वधर्मीय समाजबांधव यांचे श्रद्धास्थान असलेले हजरत मौला अली दर्गाह येथे नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करून चादर चढवली.अंबाजोगाईतील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक व क्षीरसागर कुटुंबावर निस्वार्थ भावनेतून प्रेम करणारे शिवसैनिक विनोद पोखरकर यांनी बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कंञाटी कर्मचा-यांचा सन्मान केला.पुरूष कामगारांना ऊन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी गमजा,टोपी तर कंत्राटी महीला कामगार यांना मास्क व अॅप्रन आदी साहित्याचे वाटप केले.तसेच पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.सोबतच हजरत मौला अली दर्गाह येथे दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करून चादर चढवली.मागील 10 वर्षांपासून विनोद पोखरकर यांनी बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने वृक्षारोपण, स्वाराती रूग्णालयात फळवाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणीजणांचा सन्मान, गरजूंना वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य व मदत केली.यावर्षी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या आवाहनानुसार बुधवार,दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवसेनेचे युवा नेते विनोद पोखरकर यांनी मिञ परिवाराला सोबत घेऊन वाढदिवसानिमित्त सदरील उपक्रम राबविले.कोरोनाच्या संकटकाळात अंबाजोगाई शहर स्वच्छ रहावे म्हणून सर्वांत जास्त मेहनत घेतली अशा कंत्राटी महीला व पुरूष कामगार यांच्या कार्याची योग्य दखल घेतली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे,पत्रकार

विश्वनाथ कांबळे,विद्यार्थी सेनेचे अंबाजोगाई तालुकाप्रमुख

अभिमन्यू वैष्णव,युवा सेनेचे केज विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर व सर्व युवा सेना कार्यकर्ते आणि कल्याण गायके,तुकाराम शिंदे, सुनिल कदम,पंकज परदेशी,गजानन देशपांडे,मनोज बरदाळे हा मित्र परिवार उपस्थित होता.


Thursday 18th of February 2021 06:47 PM

Advertisement

Advertisement