केज – होळ (ता. केज) येथील अंगद महादेव राख या तरुणाची दुचाकी (एम. एच. ४४ ए.बी. ५३३१) त्याचे चुलते श्रीकृष्ण सूर्यभान राख हे गावातून येण्यासाठी घेऊन गेले. २३ जुलै रोजी रात्री ९ वाजता वैभव बियरबार येथून गावाकडे येत असताना दुचाकी स्लिप होऊन पडले. त्यानंतर त्यांनी दुचाकी तेथेच लावून दुसऱ्या दुचाकीवर आले.
दुसऱ्या दिवशी दुचाकी लावलेल्या ठिकाणी आढळून न आल्याने तिचा शोध घेतला. मात्र ती दुचाकी मिळून आली नाही. ५५ हजार रुपये किंमतीची ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अंगद राख याने दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार अमजद सय्यद हे करीत आहेत.