Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

धारूर तालुक्यात गांवदरा, अंबेवडगाव परिसरात जोरदार अवकाळी पाऊस

Updated: फेब्रुवारी 23, 2026

By Vivek Sindhu

धारूर तालुक्यात गांवदरा,अंबेवडगाव परिसरात जोरदार अवकाळी पाऊस

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर – धारूर तालुक्यात सोमवारी दुपारी अवकाळी पावसाचे आगमन होऊन, कांही गावात जोरदार पाऊस झाला.अवकाळी पावसाने डाळींब आंबा फळांसह गहु,ज्वारी, हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

धारूर तालुक्यात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन, दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारे चालु होऊन, पावसाचे वातावरण तयार झाले.कांही वेळातच जोरदार अवकाळी पाऊस चालु झाला.तालुक्यातील गावंदरा, अंबेवडगाव, अरणवाडी येथे जोरदार पाऊस झाला.तर थेटेगव्हाण, परिसरात रिमझिम पाऊस झाला.या अवकाळी पावसाचा रब्बी पिका॔ना जबर फटका बसण्याची शक्यता असून, मोहरात आलेल्या अंबा व डाळींब फळाला खुपच मोठा फटका बसणार असल्याचे दिसते.वादळी वाऱ्याने मोहर गळु लागल्याचे दिसते.तसेच गहु, ज्वारी, हरभरा आदि रब्बी पिकांना ही खुप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांचे चिंतेत भर पडत आहे.एकुनच या अवकाळी पावसाने मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे.


Categories

Recent Posts