अंबाजोगाई – संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीचा उपक्रमातर्फे विविध शाळेत ‘संवाद विद्यार्थ्यांशी’ करत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
मुलांमध्ये कष्ट करण्याचे, नाते जपण्याचे संस्कार व्हावेत, इतरांना मदत करण्याची सामाजिक भावना निर्माण व्हावी या हेतूने हा संवाद उपक्रम राबविण्यात आला. यात मुळ अंबाजोगाईचे रहिवासी व सध्या चंद्रपूर येथे मुख्य न्यायदंडाधिकारी पदी कार्यरत असलेले प्रशांत कुलकर्णी यांनी विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी हसत, खेळत हा संवाद साधला. यासाठी आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी पुढाकार घेतला.
आंबेजोगाई व परिसरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल, सरस्वती पब्लिक स्कूल व दादाराव कराड माध्यमिक विद्यालय, जिजामाता स्कूल, योगेश्वरी महाविद्यालय, केंब्रिज स्कूल, इकबाल विद्यालय व महाविद्यालय, सांडेश्वर विद्यालय चनई, जयभवानी विद्यालय लोखंडी सावरगाव, ज्ञानदीप पोलीस अकॅडमी, योगेश्वरी मुलांचे विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, पोद्दार स्कूल, देशमुख कोचिंग क्लासेस, दिल्ली पब्लिक स्कूल परळी, न्यू हायस्कूल परळी या शाळांमध्ये न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शन केले.