Breaking
Updated: डिसेंबर 22, 2025
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका
केज – केज तालुक्यातील एका गुंडावर आणि गेवराई तालुक्यातील एका वाळू माफियावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून या दोघांची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीसह वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सुचनेवरुन युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी विकास साहेबराव ऊर्फ बबन गोरे (रा. माळेगांव ता. केज) या आरोपीचा व चकलंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी राजेश ऊर्फ भोल्या बंडू नाटकर (रा. राक्षसभुवन ता. गेवराई) या वाळू माफियाविरुध्द एमपीडिए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला होता.
युसुफवडगाव पोलीस ठाण्यात विकास गोरे याच्याविरुद्ध घरात घुसून मारहाण करणे, जबरीने बलात्कार करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर स्वरूपाच्या पाच गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे यासाठी त्याच्यावर कलम १२६ बीएनएसएस अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरी सुध्दा त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. तर चकलंबा पोलीस ठाण्यात राजेश ऊर्फ भोल्या नाटकर याच्याविरुद्ध गौण खनिज वाळूची चोरी करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे या व अशा गंभीर स्वरूपाचे पाच गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर कलम १२९ बीएनएसएस अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र तरी त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
याप्रकरणी जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन २० डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध एमपीडिए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून या दोघांना ल तात्काळ ताब्यात घेवून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हजर करून स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड, सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, सपोनि संदीप पाटील यांनी गोपणीय माहीतीच्या आधारे दोघांना २० डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन मुदतीत कारागृहात स्थानबध्द केले आहे.
भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या, खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर, बेकायदेशीर जुगार व लॉटरी चालवणारे व्यक्तीवर जास्तीत जास्त एमपीडिए व एमसीओसीए कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (भापोसे) यांनी दिले आहेत.