Breaking
Updated: June 17, 2025
WhatsApp Group
Join Nowगेवराई व माजलगाव तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या संजय रामदास पवार (वय ४०, रा. सावरगाव, ता. गेवराई) या धोकादायक गुंडावर अखेर एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
संजय पवारविरुद्ध गेवराई, माजलगाव ग्रामीण, अंबड व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, चोरी, दंगा, अपहरण, खंडणी, वाळू चोरी, संघटित गुन्हेगारी यांसह एकूण ८ गंभीर गुन्हे नोंद आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया व जिल्हा बदली (हद्दपार) करण्यात आली होती. मात्र त्याने गुन्हेगारीची साखळी सुरुच ठेवली होती.
दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. आज १६ जून रोजी पोलीस उपअधीक्षक स्वागुशा बीड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, पोउपनि महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने संजय पवारला ताब्यात घेतले. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलीसांनी त्याला अटक करून हर्सल कारागृह, छ. संभाजीनगर येथे रवानगी केली.
ही कारवाई पो.नि. बालक कोळी, पो.नि. शिवाजी बंटेवाड, पो.उपनि. पवन निंबाळकर, महेश विघ्ने, तसेच स्थागुशा बीड व माजलगाव ग्रामीण पोलीसांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुंडांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले.