Breaking

हायवा दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

Updated: June 27, 2025

By Vivek Sindhu

हायवा दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

WhatsApp Group

Join Now

सिरसाळा – बीड-परळी महामार्गावर सिरसाळा जवळ हायवा व दुचाकीचा भीषण अपघात आज बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ०९ च्या सुमारास झाला.या अपघातात दुचाकीस्वार अमोल बालासाहेब लव्हाळे (रा. सुकळी) यांचा जागीच मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

परळी-सिरसाळा रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, बीडकडून सिरसाळ्याकडे जाताना जैन पेट्रोल पंपाजवळ रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी याच धोकादायक ठिकाणी बीडकडून सिरसाळ्याकडे जाणाऱ्या भारत बेंज कंपनीच्या एका हायवाने अचानक ब्रेक दाबले.

त्यामुळे पाठीमागून येणारी दुचाकी एम.एच. ४४ आर ९०८१ याची हायवाला जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात घडला, अपघातानंतर अमोल लव्हाळे हे जागीच कोसळले आणि गंभीरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचारांसाठी प्रथम सिरसाळा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी परळी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.