Breaking

गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच कराः ज्ञानेश्वरी मुंडे

Updated: July 19, 2025

By Vivek Sindhu

गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच कराः ज्ञानेश्वरी मुंडे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड – न्याय मागण्यांसाठी आंदोलन केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच का करत नाही, असा उद्विग्र सवाल व्यापारी मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. विष प्राशन केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना माझी लेकरे अनाथ करायची नसतील तर माझ्या पतीच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी ज्ञानेश् वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी विष प्राशन केले होते. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान विष प्राशन केल्यावरून बीड शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर अद खलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी कुणाकडे न्याय मागायचा.

मी न्याय मागत असल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा एकदाचा विषय संपवून टाका. गुन्हा दाखल केला तरी मी महिनाभर थांबून एसपी ऑफिससमोर येत आत्मदहन करणारच, असा इशाराही त्यांनी दिला. ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर माझी लेकरे अनाथ करायची नसतील तर त्यांनी तात्काळ आर ोपींना अटक करावी. मला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ३ दिवसांमध्ये जर आम्हाला वेळ भेटली नाही तरी मी त्यांच्या बंगल्यासमोर त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना मागणी आहे की, आम्हाला १० मिनिटे तरी वेळ देण्यात यावा.

आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय देतील, आमचे म्हणणे ऐकून घेतील. पोलिसांनी मला जर गोळ्या घातल्या तर महादेव मुंडे प्रकरणी कुणीच न्याय मागणार नाही. मला संपवून हा विषयच संपवून टाका, असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंना सांगितला घडलेला प्रकार

ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, माझे सकाळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलणे झाले. त्यांना मी सांगितले की, विष प्राशन केल्यामुळेच माझ्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता कुठे जायचे कुणाकडे न्याय मागायचा? असा सवाल मी त्यांना केला आहे.