Breaking
Updated: फेब्रुवारी 17, 2026
साळेगाव येथे १०१ शिवस्मारक यात्रेचे भव्य स्वागत !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांचे १०१ शिव स्मारक यात्रेचे साळेगाव येथील गावकऱ्यांनी स्वागत केले.
या बाबतची माहिती अशी की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर या महापुरुषांच्या १०१ पुतळ्यांची शिव स्मारक यात्रे काढली आहे. कळंब, माळेगाव मार्गे ही यात्रा साळेगाव येथे आलेली असताना शिवप्रेमी आणि आंबेडकर प्रेमी युवा कार्यकर्त्यांनी बाळराजे आवारे पाटील यांचा पुष्पहार घालून स्वागत केले तर रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी मधून सर्व महापुरुषांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी सरपंच कैलास जाधव पाटील, उपसरपंच गणेश गालफाडे, मधुकर अंधारे, बाळासाहेब इंगळे, रोशन सरवदे, जय जोगदंड, लक्षण ओव्हाळ, अक्षय वरपे, अभिषेक लांडगे, सुमित नन्नवरे, रामेश्वर शिंदे, वैभव शिंदे, नवनाथ इंगळे, रितेश बचुटे, यश बचुटे, भागवत जाधव, समाधान इंगळे, गौतम बचुटे यांच्यासह अनेक नागरिक आणि स्मारक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.