Breaking

जहारवाडीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

जहारवाडीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील जहारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करत असताना एका कर्मचाऱ्याला मारहाण करून धमकावण्यात आल्याची घटना २ मार्च रोजी घडली. फिर्यादी परशुराम सुखदेव चौधरी हे प्रभाग रचनेचे काम करत असताना आरोपी गणेश भास्कर जवरे याने तिथे येऊन घरकुलाच्या हप्त्यावरून वाद घातला. आरोपीने चौधरी यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘तू इथे कशी नोकरी करतो ते बघतोच’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. या कृत्यामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार देवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत कर्मचारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts