Breaking

नाशिकात झालेल्या अश्व प्रदर्शनात केजच्या राणाचा डंका 

Updated: एप्रिल 3, 2026

By Vivek Sindhu

नाशिकात झालेल्या अश्व प्रदर्शनात केजच्या राणाचा डंका

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड जिल्ह्यातील केजच्या गोविंद देशमुखांचा राणा देशात तिसरा

केज :- बीड जिल्ह्यातील केज येथील देशमुख यांचे राणा नावाचा अश्व अंतर राष्ट्रीय स्तरावर झालेल्या अश्व. प्रदर्शनात देशात तिसरा आला आहे. यामुळे आता केजची शान वाढली आहे. 

केज तालुक्यातील तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून फोटो आणि व्हिडिओ शूटिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले दत्ता फोटो स्टुडिओचे दत्तात्रय देशमुख यांचे चिरंजीव गोविंद आणि कृष्णा या दोन भावांनी आपला रस्ते विकास बांधकाम व्यवसाय सांभाळून छंद म्हणून सांभाळला राणा नावाचा अत्यंत उमदा आणि चपळ अश्व पाळलेला आहे.

नाशिक येथे झालेल्या देशपातळीवर झालेल्या नाशिक एक्विन फिस्टा, मारवाडी ब्रीड हॉर्स शो २०२६ मध्ये आयोजित केलेले या स्पर्धेत देशातील आणि राज्यातील विविध भागातील अश्व प्रेमींनी त्यांचे अश्व सहभागी होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अश्वात  विविध कसोट्या आणि गुणांकनाच्या जोरावर कृष्णा देशमुख यांच्या राणाने स्पर्धेत सर्व द्वितीय पारितोषिक मिळविले आहे.

आयोजकांच्या वतीने घोड्याचे मालक कृष्णा दत्तात्रय देशमुख यांना स्मृती चिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कृष्णा देशमुख यांच्या सोबत घोड्याचे प्रशिक्षक देखील उपस्थित होते.


Categories

Recent Posts