Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
गोरगरीब, गरजवंत रुग्णांना निस्वार्थ मदतीचा हात देणारे आरोग्यसेवक : नंदकिशोर मुंदडा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelराजकारण हे केवळ सत्तेपुरते नसून लोकसेवेची न थांबणारी धडपड आहे, हे सातत्याने कृतीतून सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नंदकिशोर मुंदडा (काकाजी). तब्बल साडेचार दशकांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय असले तरी त्यांचे खरे अस्तित्व समाजकारणातच दिसते. पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता यापलीकडे जाऊन सामान्यांच्या अडचणी सोडविण्यातच त्यांना समाधान मिळते.
आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य मतदारसंघात सर्वाधिक प्रभावी ठरले आहे. रुग्णालयातील कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होण्याची त्यांची पद्धत आजही कायम आहे. दिवस-रात्र त्यांचा मोबाईल वाजत असतो. कोणताही रुग्ण किंवा नातेवाईक मदतीसाठी फोन केला की काकाजि क्षणाचाही विलंब न लावता कामाला लागतात. एखादा रुग्ण रुग्णालयात पोहोचायच्या आधी डॉक्टरांना सूचना गेलेली असते. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर ते स्वतः कॉल करून फीडबॅक घेतात. रुग्ण, नातेवाईकांना “तुमचं काम झालं बरं का” असं स्वतः सांगतात. रुग्णाला दाखल करणे, बेड उपलब्ध करून देणे, उपचारांवर देखरेख ठेवणे, आवश्यकता भासल्यास टिफिन पाठवणे ही सेवा निस्वार्थपणे ते अनेक दशकांपासून अविरतपणे करीत आहेत.
कोरोनाच्या कठीण काळात नंदकिशोर मुंदडा हेच हजारो रुग्णांसाठी आधार बनले. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, हॉस्पिटल बेड, रुग्णवाहिका, डॉक्टर, अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी ते स्वतः आघाडीवर होते. अनेक नेते भीतीमुळे घरातच थांबले असताना काकाजी स्वतःच्या वयाची, आरोग्याची काळजी न करता थेट कोरोना वॉर्डांमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करत, उपचारांची पाहणी करत राहिले. त्यांच्या घरातून दररोज शेकडो टिफिन रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये पोहोचत होते. नंदकिशोर मुंदडा यांची लोकसेवा राजकीय सीमांपलीकडे आहे. रुग्णांसाठी मदत करताना पक्ष, विचारसरणी किंवा कोणत्याही गटाचा भेदभाव त्यांच्याकडे कधीच दिसला नाही. विरोधक किंवा समर्थक असा भेद न मानता ते प्रत्येकाला समान महत्त्व देतात.
ते केवळ रुग्णांचीच नव्हे तर डॉक्टरांचीही तेवढीच काळजी घेतात. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, लोखंडी सावरगाव, केज उपजिल्हा रुग्णालय, नेकनूर स्त्रीरुग्णालय यांसह प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे. डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. नवीन डॉक्टरांच्या राहण्या-खाण्यापासून ते त्यांच्या अडचणी सोडविण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये ते मदत करतात. त्यामुळे डॉक्टरांसोबत त्यांचा विश्वास आणि स्नेह अधिक दृढ असल्याने गरजेच्या वेळी तेही तत्परता दाखवतात.
लोकसेवा हीच खरी राजकारणाची व्याख्या असल्याचे नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. गोरगरीब, गरजवंत आणि संकटात सापडलेल्या रुग्णांना निस्वार्थ मदतीचा हात देत त्यांनी आरोग्यसेवा क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.