Breaking
Updated: जानेवारी 15, 2026
केज पोलिसांनी तिर्रट खेळणारे आठ जण पकडले ; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज पोलिसांनी कानडी रस्त्यावरील एका धाब्याच्या आडुशाला तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना छापा मारून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील एक लाख ८८ हजार रुपयांच्या चार दुचाकी, ८३ हजाराचे आठ मोबाईल, नगदी ४२ हजार ५६० रुपये असा तीन लाख तीन हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केजहून कानडी रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या धाब्याच्या आडुशाला काही लोक तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम, फौजदार अमिरोद्दीन इनामदार, जमादार महावीर सोनवणे यांच्या पथकाने १४ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी विकास बब्रुवान वाघमारे, गणेश ज्योतीराम पवार, किरण अनिल बडे (तिघे रा. क्रांतीनगर, केज), अक्षय रामभाऊ चाटे (रा. तांबवा ता. केज), इसाक रज्जाक शेख, सद्दाम खाजा पठाण (दोघे रा. कोकचपीर, केज), रामकीसन रंगनाथ कदम (रा. विठ्ठलनगर, केज), महेश नंदकिशोर कदम (रा. वकिलवाडी, केज) या आठ जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, एक लाख ८८ हजार रुपयांच्या चार दुचाकी, ८३ हजाराचे आठ मोबाईल, नगदी ४२ हजार ५६० रुपये असा तीन लाख तीन हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून विकास वाघमारे, गणेश पवार, किरण बडे, अक्षय चाटे, इसाक शेख, सद्दाम पठाण, रामकीसन कदम, महेश कदम या आठ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.