Breaking
Updated: डिसेंबर 26, 2025
घाटनांदुर व परिसरातील शेतकऱ्याची कृषी सेवा केंद्रकडून लुटमार करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा – परमेश्वर वैद्य
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelघाटनांदुर – अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले येथील कृषी सेवा केंद्र या दुकानदाराकडून घाटनांदुर व परिसरातील 20 ते 25 खेड्यातील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लुटमार दुकानदाराकडून सामान्य शेतकऱ्याला युरिया खत दुकानात साठा असून दुकानात कृत्रिम टंचाई दाखवली जाते पण दुकानदाराच्या मर्जीतील शेतकऱ्यांना खत दिला जातो पण युरिया खताचे दुप्पट भावाने विक्री केली जाते, खते,बी–बियाणे ,औषध,जी.एस.टी बिल न देणे अशा अनेक वस्तूची विक्री करून कृषी सेवा केंद्र दुकानदाराकडून अनेक दिवसापासून लूटमार होत आहे मात्र या सर्व गोष्टीकडे कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत असल्यामुळे पत्रकार परमेश्वर मुंजा वैद्य यांनी 22 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई कार्यालयात निवेदन देऊन घाटनांदुर येथील व परिसरातील शेतकऱ्याची कृषी सेवा केंद्राच्या दुकानदाराकडून होणारी लूटमार करणाऱ्या दुकानदारावरची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा घाटनांदुर व परिसरातील शेतकऱ्याकडून आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शेतकऱ्याच्या या होणाऱ्या घाटनांदुर येथील कृषी सेवा केंद्राकडून लूटमार करणाऱ्या दुकानदारावर तालुका कृषी अधिकारी काय कारवाई करणार याकडे घाटनांदुर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे