Breaking

घरफोडी प्रकरणातील आरोपी अटक; बीड शहर पोलिसांची कामगिरी

Updated: सप्टेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

बीड शहर पोलिसांची कामगिरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील पिंगळे गल्ली परिसरात घडलेल्या घरफोडी व दागिने चोरीच्या प्रकरणातील आरोपीला बीड शहर पोलिसांनी नांदेड येथे सापळा रचून अटक केली. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

धनराज गुरखुदे हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरला गेले होते. त्या काळात त्यांनी घराला कुलूप लावले असताना अज्ञात चोरट्याने कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून सोने-चांदीसह मौल्यवान वस्तू लंपास केल्या. घटनेनंतर बीड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली.

तपासादरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा स्थानिक रहिवासी शिवा नंदलाल गुरखुदे असल्याचे समोर आले. यापूर्वीही जबरी चोरी व मारामारीसह अनेक गुन्ह्यांत तो वॉन्टेड होता. चोरीनंतर तो बीडमधून फरार झाला होता. दरम्यान, तो नांदेडमधील गणेशोत्सव कार्यक्रमांना जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बीड पोलिसांच्या पथकाने नांदेड येथे गुप्त सापळा लावून त्याला अटक केली.

आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय महेश जाधव, अंमलदार गहिनीनाथ बावनकर व राम पवार यांनी केली.


Categories

Recent Posts