Breaking

वैर व व्देषामुळे नात्यांमध्ये कटुता वाढली

Updated: फेब्रुवारी 25, 2026

By Vivek Sindhu

गीता दिदी, राजयोग शिबीर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गीता दिदी, राजयोग शिबीर

अंबाजोगाई : वैर व व्देष हे नाते संबंधामध्ये कटुता निर्माण करतात, पर्यायी कुटुंब विखुरले जातात. कुटुंबामध्ये प्रेम आणि स्नेह वाढवण्यासाठी आत्मदृष्टी निर्माण करण्याची गरज माऊंटअबू (राजस्थान) येथील गीता दिदी यांनी येथे व्यक्त केली.
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात मंगळवारी (दि.२४) झालेल्या राजयोग शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी हेतल दिदी, पूजा दिदी सुनिता बहेनजी यांची उपस्थिती होती.
कुटुंबातील एकतेचा आधार – प्रेम व विश्वास या विषयावर गीता दिदी बोलताना म्हणाल्या, की कुटुंबामध्ये एकता, प्रेम निर्माण करावयाचा असेल तर स्वार्थीपणा विसरून आपसात समन्वय साधला पाहिजे
यांत्रिकीकरणामुळे मनुष्य भौतिक सुखाकडे वळला आहे. नवीन एआयच्या तंत्रज्ञानामुळे मनुष्य कृत्रीम बुध्दीमत्तेवर अवलंबून राहिला आहे. पिढीजात संस्कार विसरत चालला आहे. यामुळे नवीन युवा पिढी भरकटत आहे. त्यात मोबाईलचेही मोठे दुष्परिणाम जाणवत आहेत. खेळाच्या वयात हातामध्ये मोबाईलचे खेळ सुरू झाले आहेत. या भौतिक साधनांची सवय लागल्याने आई, वडील, आजी, आजोबा हे नाते माणुस विसरत आहे. मनाची शांती राहिली नाही. ही नवीन साधने नात्यातील संबंधात बाधा निर्माण करत आहेत. यासाठी ध्यानधारणा व राजयोग धारण करण्याची गरज गीता दिदी यांनी व्यक्त केली.
धर्म, जात, पंथ, या पलिकडे जाऊन विचार झाला पाहिजे. युवकांमध्ये ऐकण्याची व सहन करण्याची क्षमता राहिली नाही. प्रत्येकाच्या इच्छा वाढत चालल्याने मनापासून माणूस व कुटुंब भरकटत आहेत. मनाची शांती राहिली नाही. नवीन साधने नात्यामध्ये बाधा निर्माण करत आहेत. स्वार्थी वृत्ती वाढल्याने माझे कोणी नाही असा ग्रह झाला आहे. धन व साधन हेच सर्वकाही असल्याचा भ्रम झाला आहे. माणूस हा भय चिंता व तणावामध्ये गुरफटला आहे. यासाठी नात्यांमध्ये एकता, प्रेम भावना वाढली पाहिजे. आपसात समन्वय असेल तर नात्यामध्ये प्रेम व स्नेह वाढेल. असेही गीता दिदी म्हणाल्या.


Categories

Recent Posts